ayurved-institute

रा .आ. पोदार आयुर्वेदीक वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई या ठिकाणी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन

रा .आ. पोदार आयुर्वेदीक वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई या ठिकाणी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन

दिनांक २० सप्टेंबर २०२३
दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता रा .आ. पोदार आयुर्वेदीक वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई या ठिकाणी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन.

महाराष्ट्र शासन, आयुष संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांचेकडून आलेल्या सूचनेनुसार शासनाने (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग) महाराष्ट्र राज्यात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान माहे डिसेंबर २०२३ पर्यंत राबवावयाचे आहे. त्या संदर्भामधे खालील विषयांबाबत जनसामान्यांमधे व्यापक जनजागृती करावयाची आहे. 

१. गर्भिणी परिचर्या संबंधी जनजागृती .
२. दिनचर्या व ऋतुचर्या संबंधी जनजागृती .
३. स्थूलपणा व मधुमेह प्रतिबंधा बाबत जनजागृती .
४. गुद् गत विकार प्रतिबंधा बाबत जनजागृती .

वरिल विषयांस अनुसरून  आज दिनांक २० सप्टेंबर २३२३ रोजी सकाळी ९.०० वाजता रा .आ.  पोदार आयुर्वेदीक  वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई या ठिकाणी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन आयुष संचालक , माननीय  डॉ. रामण घुंघराळेकर सर, माननीय अधिष्ठाता रा . आ . पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय  महाविद्यालय  डॉ. संपदा संत मॅडम , यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जनजागृती अभियान अंतर्गत नियुक्त  नोडल ऑफिसर डॉ. ज्योती मेघडंबर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत मुक्कावार , स्त्री रोग प्रसूती विभागाचे विभागप्रमुख डॉ. मनोज गायकवाड ,  शल्यतंत्र विभागप्रमुख डॉ. विजय उखळकर, पंचकर्म विभागप्रमुख डॉ. सीमा बहातकर उपस्थित होते. कायचिकित्सा विभागप्रमुख डॉ. गीता परुळकर ,तसेच  डॉ. वाघमारे सर, डॉ. प्रशांत दळवी, डॉ. साळुंके , डॉ. मीनाक्षी  रेवडकर , डॉ. मगरे ,डॉ. आरती दाते, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. माधुरी भंडारे, डॉ. राजीव टारपे,डॉ. श्रीकांत, डॉ. शुभदा हाके, डॉ. प्राची तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.  सर्वांच्या सहकार्याने जनजागृती अभियानाची सुरुवात झाली.

दिनांक २० सप्टेंबर २०२३
रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे रक्तदान शिबिर आयोजित

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २०२३ सप्टेंबर २०२३ रोजी रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ३२ रक्तदात्यांनी लाभ घेतला. तसेच त्यांना दिनचर्या व ऋतुचर्या या विषयांचे महत्व सांगण्यात आले .

दिनांक २० सप्टेंबर २०२३
रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे वैद्य . राज सातपुते Director at Jyovis Hospital of Ayurved, दादर, मुंबई यांचे व्याख्यान आयोजित.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे वैद्य . राज सातपुते Director at Jyovis Hospital of Ayurved, दादर, मुंबई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले .

या व्याख्यानात त्यांनी दिनचर्या व ऋतुचर्येचे महत्व सांगितले . तसेच त्यांनी Scientific Practical Application and Implementation of Dincharya and Rutucharya या विषयावर मुख्यतः विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . दैनंदिन व्यवहारातील त्याचे महत्व पटवून दिले . सदर व्याख्यानास एकूण 200 विद्यार्थी, अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ३२ रक्तदात्यांनी लाभ घेतला. तसेच त्यांना दिनचर्या व ऋतुचर्या या विषयांचे महत्व सांगण्यात आले .

दिनांक २१ सप्टेंबर २०२३
रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे श्रीमती सारीका महोत्रा Neuro linguistic Programming and Soft Skill Trainer यांचे व्याख्यान आयोजित..

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत व गणेशोत्सवा निमित्त आज दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे श्रीमती सारीका महोत्रा Neuro linguistic Programming and Soft Skill Trainer यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . या व्याख्यानात त्यांनी Soft skills डॉक्टरांनी कसे वापरावे व त्याचे महत्व सांगितले . तसेच त्यांनी Implementation of soft skills या विषयावर मुख्यतः विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . दैनंदिन व्यवहारातील तसेच जनजागृती अभियानात याचा उपयोग कसा करता येईल त्याचे महत्व पटवून दिले . सदर व्याख्यानास एकूण १५० विद्यार्थी, अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

दिनांक ३० सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत दिनांक ३० /०९/२०२३ रोज़ी रा.आ. पोदार वैद्यक (आयु) महाविद्यालय येथे आयुर्वेद जनजागृती या विषयावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत पदवी व पद्व्युत्तर असे एकूण 109 घोषवाक्य विद्यार्थ्यांनी तयार केले . त्या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून आदरणीय डॉ. सुभाषिनी लहानकर, डॉ. मीनाक्षी रेवडकर, डॉ. सीमा अत्राम , डॉ. सचिन उपलेंचवार यांनी काम पाहिले . स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक व एक उत्तेजनार्थ खालील प्रमाणे .

पदव्युत्तर विद्यार्थी
प्रथम क्रमांक - स्नेहल रच्चावार,  कायचिकित्सा विभाग
द्वितीय क्रमांक - अमोल काकड,  रोगनिदान विभाग
तृतीय क्रमांक - संजुक्ता देशमुख,  रोगनिदान विभाग

पदवी विद्यार्थी
उतेजनार्थ - सत्यम कुमार झा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवर परीक्षकांना धन्यवाद.?