ayurved-institute

गुदगत रोग जनजागृती शिबिराचे आयोजन

दिनांक: २० सप्टेंबर २०२३
मुंबई येथे शल्य तंत्र विभागातर्फे सह्याद्री या दूरचित्रवाहिनी मध्ये बातमी देऊन प्रचार व प्रसार.

दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य.आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत , रा आ पोदार वैद्यक महाविद्यालय ( आयु ), वरळी, मुंबई येथे शल्य तंत्र विभागातर्फे सह्याद्री या दूरचित्रवाहिनी मध्ये बातमी देऊन प्रचार व प्रसार करून गुदरोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. सोबत संबंधित छायाचित्र जोडीत आहोत.
surgery (1)
दिनांक: २ सप्टेंबर २०२३
गुदगत रोग जनजागृती शिबिराचे आयोजन .

२२ सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत , रा आ पोदार वैद्यक महाविद्यालय ( आयु ), वरळी, मुंबई तर्फे म आ पोदार आयुर्वेद रुग्णालयातील शल्यतंत्र बाह्यरुग्ण विभाग मध्ये गुदगत रोग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये ८५ रुग्णांना गुदगत विकारांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच गुदगत विकार टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आहार विहारांची माहिती देऊन जन जागृती करण्यात आली. सदर जनजागृती अभियान अंतर्गत ४२७ रुग्णांची जनजागृती करण्यात आली.

दिनांक: २ सप्टेंबर २०२३
२२ सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य.

आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत , रा आ पोदार वैद्यक महाविद्यालय ( आयु ), वरळी, मुंबई तर्फे म आ पोदार आयुर्वेद रुग्णालयातील शल्यतंत्र बाह्यरुग्ण विभाग मध्ये गुदगत रोग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन माननीय गायकवाड सर प्रभारी अधिष्ठाता यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शिबिरामध्ये ८६ रुग्णांना गुदगत विकारांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच गुदगत विकार टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आहार विहारांची माहिती देऊन जन जागृती करण्यात आली. सदर शिबिरास मा.डॉ.घुंगराळेकर सर आयुष संचालक , मा डॉ संत मॅडम अधिष्ठाता, मा.डॉ विजय उखळकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .संबंधित शिबिराची छायाचित्रे सोबत जोडली आहेत

दिनांक: २६ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २६/०९ / २०२३ रोजी रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी सभागृह आशा सेविका, ANM स्टाफ, कमुनिटी हेल्थ वर्करस यांना गुदगत विकारांचे प्रतिबंधक उपाय यावर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने झाली. वरील कार्यक्रम मा. अधिष्ठाता डॉ. संपदा संत व विभागप्रमुख डॉ. विजय उखळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमामध्ये डॉ. श्रीकांत वाकुडकर ( सहाय्यक प्राध्यापक, शल्यतंत्र) यांनी गुदगत विकारांचे प्रतिबंधक उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा ऐकूण ८१ आशा सेविका, ANM स्टाफ, कमुनिटी हेल्थ वर्करस यांनी लाभ घेतला.

दिनांक: २६ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दुवारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २६/०९/२०२३ रोजी रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी सभागृह येथे अंगणवाडी सेविकांना गुदगत विकारांधे प्रतिबंधक उपाय या विषयी व्याख्यान देण्यात आले. वरील कार्यक्रम मा. अधिष्ठाता डॉ. संपदा संत व विभागप्रमुख डॉ विजय उखळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने झाली. या कार्यक्रमामध्ये आय. सी. गोयार ( ICDS Officer) प्रियांका सोनार (ICDS Supervisor) करिम पटेल (Protection Officer), वंदना भोसले | ICDS Supervisor), अनिष गोरे माहिती विश्लेषक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

प्रियांका सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले, डॉ विद्या जंगले सहाय्यक प्राध्यापक शल्यतंत्र विभागातर्फे यांनी गुदगत विकाराचे प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर व्याख्यानाद्वारे सखोल मार्गदर्शन केले. डॉ. वाघमारे, डॉ. युनूस सोलंकी, डॉ माधुरी भंडारे, डॉ श्रीकांत ठाकुडकर तसेच इतर विभागाचे अध्यापक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ 34 अंगणवाडी सेविकांनी घेतला. वरील कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. दळवी यांनी केले.

दिनांक: २७ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २७/०९/२०२३ रोजी रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय तर्फे वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी येथे तिथे वास्तव्यास असणाऱ्या लोकासाठी गुदगत विकारांचे प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व त्याना त्याबद्दल माहिती देणारे माहितीपत्रके वाटप करण्यात आले. वरील कार्यक्रमास मा. अधिष्ठाता डॉ. संपदा संत या उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये डॉ. श्रीकांत वाकुडकर ( सहाय्यक प्राध्यापक, शल्यतंत्र) तसेच डॉ. प्रतीक जोशी, डॉ. शुभम वाघमोडे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच आंतरवासीय विद्यार्थी यांनी गुदगत विकाराचे प्रतिबंधक उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले.

दिनांक: ३० सप्टेंबर २०२३
दि. 30/09/2023 रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य. आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत , रा.आ.पोदार वैद्यक महा विद्यालय (आयु ), वरळी, मुंबई शल्यतंत्र विभागातर्फे म.आ.पोदार आयुर्वेद रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना गुदगत विकारांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच गुदगत विकार टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आहार विहारांची माहिती देणारे पोस्टर व भित्तीपत्रक लावून गुदगत रोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. व त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांची उत्कृष्ट पोस्टर स्पर्धा घेण्यात आली आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत , रा आ पोदार वैद्यक महाविद्यालय ( आयु ), वरळी, मुंबई कार्यक्रमास अधिष्ठाता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सदर कार्यक्रमास मा.डॉ.संत मॅडम अधिष्ठाता, मा.डॉ.विजय उखळकर सर ,विभागप्रमुख शल्यतंत्र विभाग, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मुक्कावर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास, डॉ युनूस सोलंकी सर, डॉ माधुरी भंडारे मॅडम,डॉ.वाघमारे सर,डॉ दळवी सर, डॉ सीमा बहातकर मॅडम ,डॉ ज्योती मेघडंबर,डॉ विद्या जंगले मॅडम आणि डॉ श्रीकांत वाकुडकर व विभागाचे सर्व पदव्युत्तर आणि अंतरवासिय विद्यार्थी उपस्थित होते .