महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
मराठी

द्रव्यगुण

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
English
National Emblem of India

आर. ए. पोदार वैद्यकीय (आयुर्वेदिक) महाविद्यालय
एम. ए. पोदार आयुर्वेदिक रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग

द्रव्यगुण

dravyaguna7
परिचय

औषधी वनस्पती ह्या रोगानिवारणार्थ व आरोग्याचा अविभाज्य घटक आहे .त्यांचा अभ्यास स्वास्थ्य ,दैनंदिन रक्षणार्थ व चिकित्सा कायार्थ अत्यावश्यक आहे .द्रव्यगुण विषयांतर्गत या वनस्पतींचा अभ्यास केला जातो .त्यामध्ये औषधी वनस्पतींचा विविध रोगांमध्ये उपचारार्थ सखोल अभ्यास केला जातो.

विभागामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सन १९९० पासून सुरु आहे . विभागांतर्गत 2 प्रशस्त औषधी उद्याने आहेत त्यांच्यामध्ये विविध औषधी वनस्पतींची अनेक वर्षांपासून लागवड केली आहे . तसेच औषधी वनस्पतींचा उपयोग रुग्णालयामध्ये रुग्ण चिकित्सा कार्यार्थ केला जातो . विभागामध्ये औषधी वनस्पतींचे शुष्क व आर्द्र संग्रहालय उपलब्ध आहे.

उद्यानांमध्ये २५० हून अधिक वनस्पतींची लागवड केलेली आहे . व त्यातले बहुतेक वनस्पतींना QR CODE बनविले गेले आहेत.

विभागाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पदवी (आयुर्वेदाचार्य) व पदव्युत्तर (वाचस्पती) विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे पारंपरिक, तर्कसंगत व आधुनिक चिकित्सीय उपयोग याबाबत उच्च दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण प्रदान करणे.

विभागीय सुविधा

औषधी उद्यान: विभागामध्ये दोन सुस्थितीत औषधी उद्याने असून त्यामध्ये सुमारे २९० प्रजातींच्या औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. अनेक वनस्पतींना QR कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्यांना वनस्पतींची माहिती सहजपणे प्राप्त होते.

उद्यानातील प्रमुख औषधी वनस्पती:

  • रक्तचंदन (Pterocarpus santalinus)
  • सर्पगंधा (Rauvolfia serpentina)
  • अशोक (Saraca asoca)
  • अगरू (Aquilaria agallocha)
  • अंकोल (Alangium salviifolium)
  • चंदन (Santalum album)
  • हिज्जल (Barringtonia acutangula)
विभागीय उपक्रम
  • दरवर्षी विविध औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन उपक्रम राबविण्यात येतात.
  • विद्यार्थ्यांसाठी स्थानिक तसेच राज्याबाहेरील शैक्षणिक क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात.
  • पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पती (Ph.D.) विद्यार्थ्यांना संशोधनपर मार्गदर्शन दिले जाते.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये (Journals) संशोधन लेख प्रकाशित करण्यासाठी तसेच शोधनिबंध सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते.

संग्रहालय

विभागीय संग्रहालयामध्ये अभ्यासासाठी १५० शुष्क व आर्द्र औषधी द्रव्यांचे नमुने उपलब्ध आहेत.

प्रयोगशाळा

NCISM च्या नियमांनुसार विभागाची फार्माकोग्नोसी प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणे व आवश्यक साधनसामग्रीने सुसज्ज आहे.

ग्रंथालय

विभागीय ग्रंथालयात आयुर्वेद तसेच आधुनिक शास्त्राशी संबंधित एकूण ११५ संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत.

दृकश्राव्य सुविधा

विभागात Wi-Fi सुविधेसह दोन दृकश्राव्य अध्यापन साधने उपलब्ध आहेत.

चार्ट्स

औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी एकूण २९२ शैक्षणिक चार्ट्स उपलब्ध आहेत.

शैक्षणिक क्षेत्रभेटी

औषधी वनस्पतींच्या प्रत्यक्ष अभ्यासासाठी राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य शैक्षणिक क्षेत्रभेटी नियमितपणे आयोजित केल्या जातात.

त्वचारोग बाह्यरुग्ण विभाग

त्वचा, केस व नखांच्या विविध विकारांचे निदान व आयुर्वेदीय उपचार करण्यासाठी त्वचारोग बाह्यरुग्ण विभाग कार्यरत आहे. येथे सोरायसिस, एक्झिमा, मुरुम, बुरशीजन्य संसर्ग, श्वित्र, केस गळणे इत्यादी विकारांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार दिले जातात.

शमन-शोधन चिकित्सा, पथ्य-अपथ्य सल्ला तसेच जीवनशैली व्यवस्थापनाद्वारे रुग्णांना सर्वांगीण आरोग्य लाभ मिळवून देणे हा विभागाचा प्रमुख उद्देश आहे.

Teaching Staff
विभागीय शिक्षकवृंद
नाव पात्रता पदनाम
डॉ. संजय राघोबाजी तलमले BAMS, MD, M.R.A.V. प्राध्यापक
डॉ. सीमा समीर चौघुले BAMS, MD सहयोगी प्राध्यापक
डॉ. बिपिन रमेश धालपे BAMS, MD, Ph.D. सहयोगी प्राध्यापक
डॉ. संतोष तानाजी कदम BAMS, MD सहाय्यक प्राध्यापक
डॉ. कल्याणी दिलीप सकपाळ BAMS, MD सहाय्यक प्राध्यापक

शिक्षकांची अलीकडील प्रकाशने

डॉ. संजय राघोबाजी तलमले

पुस्तके:

  • Plants and Other Drugs of Sushruta Samhita Saptadhyayi, Rashtriya Ayurved Vidyapeeth, New Delhi Publication, 2002 (Acharya Priya Vrat Sharma यांच्यासह).
  • प्रियव्रतानुग्रह अर्थात द्रव्यगुण विज्ञान, धन्वंतरी प्रकाशन, नागपूर, 2017.
  • प्रियव्रतानुग्रह – भाग १, धन्वंतरी प्रकाशन, नागपूर, 2024.
  • प्रियव्रतानुग्रह – भाग २, धन्वंतरी प्रकाशन, नागपूर, 2024.
  • प्रियव्रतानुग्रह – भाग ३, धन्वंतरी प्रकाशन, नागपूर, 2024.
  • संपूर्ण द्रव्यगुण विज्ञान, मयूर प्रकाशन, धाराशिव, 2005.

संशोधन लेख:

  • A Review Study of Lekhaniya Mahakashaya in the Management of Obesity, IAMJ, 2023.
  • Elaborative Study of Kanthya Mahakashaya, WJPR, 2021.
  • A Critical Review of MRID or Chhardinigrahan Dravya, WJPR, 2019.
  • Antifungal Activity of Root of Kasamarda, WJPR, 2019.
  • A Critical Review of Netramayhar Dravya in Guduchyadi Varga, WJPR, 2020.

डॉ. सीमा समीर चौघुले

पुस्तके:

  • Medicinal Flora of R.A. Podar Ayurved College Garden – An Illustrated Reference, 23 सप्टेंबर 2025.
  • आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्रकाशित "आयुष चिकित्सा पद्धतींची उपयुक्तता" या पुस्तकाच्या लेखनात सहभाग (2017).
  • Ayurvedic Pharmacology Demystified: A Comprehensive Guide for PG, PhD Scholars, Book River Publications, 2025.
  • Pomegranate Potency: Antimicrobial Insights, 2024.

संशोधन लेख:

  • Recent Development of Herbal Formulation – A Novel Drug Delivery System, International Ayurvedic Medical Journal, 2014.
  • Pharmacological Review of Akashvel (Cuscuta reflexa Roxb.), International Journal of Pharmacology Research, 2015.
  • Medicinal Properties of Wild Leafy Vegetables Available in Maharashtra State in Rainy Season, International Journal of Recent Scientific Research, 2015.
  • Storage, Packing and Labeling Concept with Perspective of Raw Herbs and Their Formulation, Unique Journal of Ayurvedic and Herbal Medicines, 2015.
  • Non-Medicinal Uses of Various Gums and Resins, World Journal of Pharmacy and Pharmaceutical Sciences, 2017.
  • Effect of Shodhana and Shamana Chikitsa in Eka Kushtha (Psoriasis) – A Single Case Study, WJPR, 2018.
  • Review Article on Therapeutic Potential of Different Types of Vajikarana Ghrita in Male Infertility w.s.r. to Charaka Samhita, WJPR, 2023.

डॉ. बिपिन रमेश धालपे

पुस्तके:

  • Medicinal Flora of R.A. Podar Ayurved College Garden – An Illustrated Reference, 23 सप्टेंबर 2025.

संशोधन लेख:

  • Critical Analysis of Rasayana Dravyas from Bhavprakash Nighantu on the Basis of Rasapanchaka, 2015.
  • Critical Analysis of Swasthahita Dravyas from Charak Samhita and Sushruta Samhita, 2016.
  • Effect of Shodhana and Shamana Chikitsa in Eka Kushtha (Psoriasis) – A Single Case Study, 2018.
  • Review of Traditional Medicinal Plant Amarkand from Bhimashankar Region of Maharashtra, 2023.
  • Interview Article on “Heat Waves in Summer Season and its General and Ayurvedic Management”, Chitralekha, 2023.
  • Review of Bherali Mad (Caryota urens L.): Folklore Medicinal Plant of Maharashtra, 2023.
  • An Ethnomedicinal Review of Traditional Medicinal Plant “Garambi” from Maharashtra State, 2023.
  • Critical Analysis of Shoolahara Dravyas from Haritakyadi Varga of Bhavaprakash Nighantu, 2024.
  • Critical Review of Shigru (Moringa oleifera Lam.): An Anti-Obesity Drug, 2024.
  • A Critical Review of Keshya Dravyas in Bhavaprakash Nighantu with Reference to Rasapanchaka, 2026.

डॉ. संतोष तानाजी कदम

पुस्तके:

  • Ayurvedic Pharmacology Demystified: A Comprehensive Guide for PG, PhD Scholars, 2025.
  • Pomegranate Potency: Antimicrobial Insights, 2025.

संशोधन लेख:

  • Critical Analysis of Charakokta Mahakashaya in the Management of Respiratory System Disorders w.s.r. COVID-19 Pandemic, 2023.
  • Health Determinants in Ayurveda: A Comprehensive Review of Concepts and Practices, 2024.
  • Critical Review of Shadang Paneeya: An Ayurvedic Herbal Formulation with Potential Immunomodulatory and Therapeutic Benefits, 2024.
  • Digital Health Informatics Framework for Traditional Medical Systems, 2024.
  • A Comprehensive Assessment of Ayurvedic Patient Care Services in a Modern Medicine Public Tertiary Care Hospital, 2025.
  • Patient Satisfaction with Ayurveda Out-Patient Services in a Tertiary Healthcare Setting, 2025.
  • Vasant Kusumakar Rasa: A Micronutrient-Rich Rasayana for Multi-Pronged Diabetes Management, 2025.
  • Analytical Standardization and Multi-Stage Ayurvedic Shodhana of Vacha Rhizomes (Acorus calamus Linn.), 2026.

डॉ. कल्याणी दिलीप सकपाळ

संशोधन लेख:

  • In Vitro Study of Aqueous Extract of Nagavalli (Piper betle Linn.) on SCC 29B Cell Line.
  • A Review on Sandhaniya Mahakashaya, PDEAS International Journal of Research in Ayurved and Allied Sciences, 2023.
  • Exploring Nagavalli Patra (Piper betle Linn.) through the Lens of Classical Ayurvedic Texts: A Literature-Based Review, 2026.
शिक्षकांद्वारे सादर केलेले शोधनिबंध व व्याख्याने

डॉ. सीमा समीर चौघुले

  • "Evidence Based Use of Upavisha Dravya Langali (Gloriosa superba Linn.) Formulation in Kshudra Vikara" या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण AYURBODH 2025 या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेमध्ये २२ फेब्रुवारी २०२५ रोजी केले.
  • "Ayurvedic Herbs & Spices: Ghar Ghar Mein Ayurved" या विषयावर मध्य मुंबई मराठी विज्ञान संघ येथे ३१ मे २०२५ रोजी अतिथी व्याख्यान दिले.
  • "Regional Food Traditions in India with Perspective of Ayurveda" या विषयावर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ बायोटेक्नॉलॉजी येथे १ ऑगस्ट २०२५ रोजी अतिथी व्याख्यान दिले.
  • "Vet-Ayurved / Pet-Ayurved" – प्राणी संगोपनातील आयुर्वेदाची भूमिका या विषयावर Ayush Natural World Expo 2025 मध्ये १० ऑगस्ट २०२५ रोजी व्याख्यान दिले.
  • "Endangered Species Conservation Techniques" या विषयावरील शोधनिबंध Ayush Natural World Expo 2024 मध्ये २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सादर केला.

डॉ. संतोष तानाजी कदम

  • "AI-Assisted Discovery and Safety Prediction of Ayurvedic Herb-Derived Molecules: Integrating Generative Models, Network Pharmacology and Classical Validation Frameworks" हा शोधनिबंध AYURTECH 2025 – Pradnya: AI for Ayurveda या राष्ट्रीय परिसंवादात रा. आ. पोदार आयुर्वेद महाविद्यालय, मुंबई येथे २८ डिसेंबर २०२५ रोजी सादर केला.
  • "Network Pharmacology and Phytomedicine" या विषयावरील शोधनिबंध राष्ट्रीय स्तरावरील AYUSH EXPO, गोरेगाव, मुंबई येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी सादर केला.
  • नालासोपारा आयुर्वेद महाविद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील AGNIBODH शैक्षणिक कार्यक्रमात शोधनिबंध सादर केला.
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे २४–२५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित RASABHISHAK 2024 राष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला.

डॉ. कल्याणी दिलीप सकपाळ

  • "Critical Review on Sandhaniya Mahakashaya in Atisara" हा शोधनिबंध Arogya Fest 2020, NESCO, गोरेगाव येथे १ फेब्रुवारी २०२० रोजी सादर केला.

पुरस्कार व गौरव

डॉ. संजय राघोबाजी तलमले

  • सन २०१९ मध्ये भारताचे माननीय उपराष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, नवी दिल्ली यांची फेलोशिप प्राप्त.
  • राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या प्रशासकीय मंडळाचे (Governing Body) माजी सदस्य.
  • आयुर्वेदिक फार्माकोपिया कमिटी ऑफ इंडिया (Ayurvedic Pharmacopoeia Committee of India) चे माजी सदस्य.
  • आयुर्वेद शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ इंडिया, नागपूर शाखेकडून गौरव.
  • द्रव्यगुण विषयातील योगदान व औषधी वनस्पती संवर्धन कार्यासाठी वैद्य खडीवाले प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे "व्ही. एम. गोगटे पुरस्कार" प्राप्त.
  • द्रव्यगुण विषयातील विविध पुनर्प्रशिक्षण कार्यक्रम (Reorientation Programmes) व सतत वैद्यकीय शिक्षण (CME) कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक (Resource Person) म्हणून सहभाग.

वैद्य सीमा अत्राम (चौघुले)

  • सन २०२२ मध्ये Nature Fit आणि रा. आ. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई यांच्यातर्फे प्रशंसापत्र (Appreciation Award) प्रदान.

वैद्य बिपिन धालपे

  • सन २०२२ मध्ये Nature Fit आणि रा. आ. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई यांच्यातर्फे प्रशंसापत्र (Appreciation Award) प्रदान.

संशोधन उपक्रम

पीएच.डी. संशोधक विद्यार्थी

अ. क्र. संशोधकाचे नाव संशोधन विषय
1 वैद्य आशाश्री टी. शिंदे सुप्तीमध्ये वेदनास्थापक म्हणून पद्मक (Prunus cerasoides D. Don) यावरील भौतिक-रासायनिक व नियंत्रित चिकित्सकीय अभ्यास.

पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी

अ. क्र. विद्यार्थ्याचे नाव संशोधन विषय मार्गदर्शक
1 डॉ. अंभ्रुनी रवि शतपुष्पा (Anethum sowa Kurz) व मिश्रेया (Foeniculum vulgare Mill.) यांच्या भौतिक-रासायनिक व वनस्पती रसायनशास्त्रीय गुणधर्मांचा तसेच प्रतिजैविक (Antimicrobial) क्रियेचा तुलनात्मक अभ्यास. वैद्य सीमा अत्राम
2 डॉ. मृणाल अंजने नागकेशर (Mesua ferrea Linn.) व त्याच्या पर्यायी प्रजाती सुरपुन्नाग (Ochrocarpus longifolius) आणि पुन्नाग (Calophyllum inophyllum) तसेच बाजारातील नमुन्यांचा प्रतिजैविक क्रियेच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास. वैद्य बिपिन धालपे
3 डॉ. वैष्णवी पोटकातरे पलाश पुष्प पाक (Butea monosperma Lam. Kuntze) याचे विश्लेषण व त्याची आम्ल-न्यूट्रलायझिंग क्षमता (Acid Neutralizing Capacity) यांचा अभ्यास. वैद्य सीमा अत्राम
4 डॉ. पूजा पाटील बकुळ (Mimusops elengi Linn.) साल व तिचे प्रतिनिधी द्रव्य बाभूळ (Acacia arabica Willd.) साल यांचा प्रतिजैविक क्रियेच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास. वैद्य सीमा अत्राम
5 डॉ. गीता हुन्नूरकर शतपुष्पा (Anethum sowa Kurz) व मिश्रेया (Foeniculum vulgare Mill.) यांच्या भौतिक-रासायनिक व वनस्पती रसायनशास्त्रीय गुणधर्मांचा तसेच प्रतिजैविक (Antimicrobial) क्रियेचा तुलनात्मक अभ्यास. वैद्य बिपिन धालपे

पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शोधनिबंध सादरीकरण व प्रकाशने

डॉ. अंभ्रुनी रवि

  • Ayurvedic Dermatology: Simplified Approaches for Practitioners
  • Yashtimadhu in Charakokta Agrya Sangraha
  • Integral Management of Psoriasis through Ayurvedic Dermatology: A Case Report
  • Cervical Spondylosis: An Ayurvedic Analysis
  • Clinical Application of Sariva in Lifestyle Disorders
  • Pathadi Yoga for Integral Management of Crohn’s Disease: A Case Report, IAMJ, Volume XIV (Issue 05, May 2026), ISSN: 2320-5091.

डॉ. मृणाल अंजने

  • Haritamanjari (Acalypha indica) – A Review, World Expo, NESCO, गोरेगाव.
  • Herbal Tea for Healthy Skin, AAPCON 2025 (आंतरराष्ट्रीय परिषद).
  • Bhunimbadi Churna in the Management of Ulcerative Colitis (Pittaja Grahani) – A Review, AGNIBODH राष्ट्रीय परिषद.
  • A Critical Review of Keshya Dravyas in Bhavaprakash Nighantu w.s.r. to its Rasapanchaka, IAMJ Volume XIV (Issue 04, April 2026), ISSN: 2320-5091.

डॉ. वैष्णवी पोटकातरे

  • Managing Stress and Anxiety through Ayurvedic Practices (Ayurbodh 2024).
  • Approaching Chronic Kidney Disease (CKD) through the Ayurvedic Perspective.

डॉ. पूजा पाटील

  • Evidence Based Study on Analgesic and Anti-inflammatory Action of Guggul, Shallaki and Nirgundi (Ayurbodh 2024).