महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
मराठी

अधिष्ठाता

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
English
National Emblem of India

आर. ए. पोदार वैद्यकीय (आयुर्वेदिक) महाविद्यालय
एम. ए. पोदार आयुर्वेदिक रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग

अधिष्ठाता

dean-madam
डॉ. संपदा एस. संत
अधिष्ठाता (Dean)
आर. ए. पोदार वैद्यकीय महाविद्यालय (आयुर्वेद), वरळी, मुंबई.
dean-cabine
अधिष्ठात्यांचा संदेश
“सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया:||”
 “May all be happy, May all be free from illness”
मी डॉ. संपदा एस. संत, आर. ए. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व एम. ए. पोदार रुग्णालय, वरळी, मुंबई येथे आपले मनःपूर्वक स्वागत करते.”

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जाते. अनुभवी व पात्र प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित अध्यापन, प्रात्यक्षिके, सेमिनार, चर्चासत्रे आणि क्लिनिकल प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. विद्यार्थ्यांनी सक्षम, जबाबदार आणि नैतिक मूल्ये जपणारे वैद्य म्हणून समाजसेवेसाठी कार्य करावे, हीच आमची अपेक्षा आहे.

संलग्न एम. ए. पोदार आयुर्वेद रुग्णालयामार्फत रुग्णांना परवडणारी, सुरक्षित आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचारसेवा उपलब्ध करून दिली जाते. पंचकर्म उपचार, औषधोपचार तसेच आवश्यक शल्यचिकित्सा सुविधा तज्ञ वैद्यकीय देखरेखीखाली प्रदान केल्या जातात. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधून रुग्णांच्या आरोग्यवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

संस्थेतील शिक्षकवर्ग, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचे समर्पण यामुळे संस्था सातत्याने प्रगती करत आहे. आयुर्वेद शास्त्राचा प्रसार, संशोधनाला चालना आणि समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी आम्ही भविष्यातही अधिक व्यापक कार्य करण्यास वचनबद्ध आहोत. सर्व विद्यार्थी, पालक व हितचिंतक यांचे सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षा आहे.

वैयक्तिक माहिती

नाव डॉ. संपदा एस. संत
जन्मतारीख १७ मार्च १९६९
रुजू दिनांक २४ जानेवारी २०२३
पद अधिष्ठाता (Dean), आर. ए. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई
MCIM नोंदणी क्र. I-23068 A-1
NCISM शिक्षक कोड AYKS00184

शैक्षणिक पात्रता

BAMS डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
MD (क्रियाशरीर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
PhD मुंबई विद्यापीठ

व्यावसायिक माहिती

विषय क्रियाशरीर
भाषा हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत
संशोधन प्रकाशने विविध जर्नल्समध्ये ४० संशोधन प्रकाशने

कार्यानुभव

लेक्चरर जून १९९६ ते सप्टेंबर २०००
सहप्राध्यापक सप्टेंबर २००० ते एप्रिल २०१०
प्राध्यापक एप्रिल २०१० ते जानेवारी २०२३
डीन जानेवारी २०२३ ते आजपर्यंत

संपर्क माहिती

आर. ए. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय (आयुर्वेद)
डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,
मुंबई – ४०००१८

ईमेल: deanrapmc@gmail.com