महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
मराठी

आचार्य चरक जयंती निमित्त प्रश्न मंजुषा स्पर्धा व अतिथी व्याख्यान [[NEWS_NEW_BADGE]]

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
English
National Emblem of India

आर. ए. पोदार वैद्यकीय (आयुर्वेदिक) महाविद्यालय
एम. ए. पोदार आयुर्वेदिक रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग

आचार्य चरक जयंती निमित्त प्रश्न मंजुषा स्पर्धा व अतिथी व्याख्यान [[NEWS_NEW_BADGE]]

आचार्य चरक जयंती निमित्त प्रश्न मंजुषा स्पर्धा व अतिथी व्याख्यान [[NEWS_NEW_BADGE]]

कार्यक्रम वृत्तांत

आचार्य चरक जयंती निमित्त प्रश्न मंजुषा स्पर्धा व अतिथी व्याख्यान

दिनांक १७ ऑगस्ट २०२६
आयोजक संहिता व सिद्धांत विभाग, R.A. Podar Ayurveda Medical College
स्थळ Golden Jubilee Hall

आचार्य चरक जयंतीच्या निमित्ताने संस्कृत संहिता व सिद्धांत विभाग, R.A. Podar Ayurveda Medical College यांच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

०१

प्रश्न मंजुषा स्पर्धा

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात आचार्य चरक संहितेवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण ४० गट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयज्ञानाबरोबरच त्यांची चिकित्सक विचारशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता यांची कसोटी लागली.

प्रश्नांची रचना विचारप्रवर्तक व आव्हानात्मक असल्यामुळे संपूर्ण स्पर्धा अत्यंत बुद्धीला चालना देणारी व रंगतदार ठरली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि स्पर्धेचा मनापासून आनंद घेतला.

०२

अतिथी व्याख्यान

“Clinical Aspects of Vajikaran by Charak”

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात Vd. Shrirang Galgali Sir यांचे “Clinical Aspects of Vajikaran by Charak” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात आदरणीय अधिष्ठाता डॉ. संपदा संत मॅडम तसेच प्रशासकीय अधिकारी श्री नरसु पाटील सर व सर्व विभागांचे शिक्षक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

वैद्य गलगली सरांनी चरकसंहितेतील वाजीकरण चिकित्सेच्या संकल्पना, त्यांचे चिकित्सीय महत्त्व आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यांचे अत्यंत सोप्या, प्रभावी आणि चिकित्सक दृष्टिकोनातून विवेचन केले.

त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना चरकसंहितेतील सिद्धांतांचा प्रत्यक्ष चिकित्सेमध्ये कसा उपयोग करता येतो, याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. व्याख्यान अत्यंत माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले.

कार्यक्रमाचा समारोप

एकंदरीत, आचार्य चरक जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

प्रश्न मंजुषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला व विचारक्षमतेला चालना मिळाली, तर Galgali Sir यांच्या व्याख्यानामुळे चरकसंहितेच्या चिकित्सकीय दृष्टिकोनाची अधिक सखोल समज विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.