महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
मराठी

मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – श्री माई गजानन मंदिर, वरळी, मुंबई [[NEWS_NEW_BADGE]]

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
English
National Emblem of India

आर. ए. पोदार वैद्यकीय (आयुर्वेदिक) महाविद्यालय
एम. ए. पोदार आयुर्वेदिक रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग

मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – श्री माई गजानन मंदिर, वरळी, मुंबई [[NEWS_NEW_BADGE]]

मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – श्री माई गजानन मंदिर, वरळी, मुंबई [[NEWS_NEW_BADGE]]

महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत
मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर

विषय :- लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अहवाल सादर करण्याबाबत.

मा. महोदया,

रा. आ. पोदार मेडिकल कॉलेज (आयुर्वेद) व म. आ. पोदार हॉस्पिटल, वरळी, मुंबई येथील शरीरक्रिया विभागाच्या वतीने लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत श्री. माई गजानन मंदिर, वरळी, मुंबई येथे करण्यात आले.

दिनांक २७ जुलै २०२६
वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.००
स्थळ श्री. माई गजानन मंदिर,
वरळी, मुंबई
आयोजक शरीरक्रिया विभाग,
रा. आ. पोदार मेडिकल कॉलेज (आयुर्वेद) व म. आ. पोदार हॉस्पिटल, वरळी, मुंबई

सदर शिबिराचे उद्घाटन श्री. श्रीकांत मयेकर, विश्वस्त अध्यक्ष आणि श्री. शेखर सावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वरळी नगर कार्यवाह, यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. किरण पवितवार, विभागप्रमुख, शरीरक्रिया विभाग, डॉ. कैलास सोनमनकर, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रिया विभाग तसेच शरीरक्रिया विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

सदर शिबिरामध्ये एकूण २७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

२७ रुग्णांची आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वाटप