आचार्य चरक यांच्या जयंती निमित्ताने आयोजित पोस्टर निर्माण स्पर्धा
क्रिया शरीर विभागाच्या वतीने आचार्य चरक यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 20/08/2026 रोजी पोस्टर निर्माण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत शंभरपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण 52 पोस्टर तयार केले होते.
सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या सन्माननीय अधिष्ठाता डॉ. संपदा संत मॅडम यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री. नरसु पाटील सर, शरीर रचना विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मिलिंद निकुंभ सर तसेच संहिता विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश कोलारकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदरणीय डॉ. संत मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहभागी स्पर्धकांनी अत्यंत उत्तम प्रकारे आपल्या विषयावर रेखाटलेल्या पोस्टरद्वारे माहिती सादर केली.
अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. मिलिंद निकुंभ सर आणि डॉ. राजेश कोलारकर सर यांनी उत्तम पद्धतीने काम करत स्पर्धेचे यशस्वी मूल्यांकन केले.
क्रिया शरीर विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किरण पबीतवार यांनी प्रास्ताविक केले, तर संयोजक डॉ. कैलास सोनमनकर सर यांनी आभार व्यक्त केले.
विभागातील समस्त पदव्युत्तर विद्यार्थी व अध्यापकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाची क्षणचित्रे
छायाचित्रावर क्लिक करून मोठ्या आकारात पहा