ayurved-institute

जनजागृती अभियान प्रचार करणे हेतु दूरदर्शन सह्याद्रि वाहिनी ला ‘गर्भिणी परिचर्या’ या विषयी स्मॉल बाइट्स

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियानाचे उद्घाटन दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता रा आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई येथे आयुष संचालक माननीय डॉ. रामण घुंगराळेकर सर, माननीय अधिष्ठातारा आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय डॉ. संपदा संत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

स्त्री रोग विभाग प्रमुख मनोज गायकवाड़, सहयोगी प्राध्यापक प्रशांत दळवी व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.जनजागृती अभियान प्रचार करणे हेतु दूरदर्शन सह्याद्रि वाहिनी ला 'गर्भिणी परिचर्या' या विषयी स्मॉल बाइट्स द्वारे महिती स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. मनोज गायकवाड़ यांच्या द्वारे प्रसारणासाठी देण्यात आली. सदर अभियान रुग्णाना किती लाभदायक आहे हे पाहाण्यासाठी प्रत्यक्ष (स्त्री रोग व प्रसुती तंत्र) अंतर रुग्ण व बाह्य रुग्ण विभगातील रुग्णांशी सवांद साधला. रुग्णांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
garbhini-paricharya
WordPress PopUp Plugin