ayurved-institute

पंचकर्म विभागाद्वारे स्थौल्य जनजागृती अभियान व शिबिर

दिनांक: २० सप्टेंबर २०२३
पंचकर्म विभागाद्वारे स्थौल्य जनजागृती अभियान व शिबिर
आज दि.२०/०९/२०२३ या रोजी आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत रा.आ.पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील पंचकर्म विभागाद्वारे स्थौल्य जनजागृती अभियान व शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी मा. अधिष्ठाता डाॅ. संपदा संत मॅडम , विभागप्रमुख डॉ.सीमा बहातकर मॅडम, डॉ.मनोज गायकवाड सर(विभागप्रमुख स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र), डॉ.सुश्रुत मुक्कावार सर(RMO), डॉ.शीतल लोढामॅडम(सहयोगी प्राध्यापक), डॉ.ज्योती मेघडंबर(Nodal Officer),मा डॉ.राजीव टारपे सर(सहाय्यक प्राध्यापक) डॉ.सुरेश दहिफळे सर(सहाय्यक प्राध्यापक) यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रम बाह्य रुग्ण विभागामध्ये "स्थौल्य" या व्याधी निदान,आहार,विहार, चिकित्सा या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचा ७२ रूग्णांनी लाभ घेतला.या शिबीरामध्ये दूरदर्शन वाहिनी द्वारे सहभागी रूग्णांचे लघु संवाद घेण्यात आले. तसेच विभागातील सर्व पदव्युत्तर विद्यार्थी व आंतवासीय विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग.
दिनांक: २६ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी रा .आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई , येथे मुंबईतील सुप्रसिद्ध वैद्य. श्री. विनय वेलणकर यांचे 'बस्ति चिकित्सा अनुभव' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले . या व्याख्यानात त्यांनी जनसामान्यांकरीता बस्ति चिकित्सेचे महत्त्व सांगितले तसेच त्यांनी बस्ति चिकित्सेचा विविधांगी वापर कसा करावा या विषयावर मुख्यतः विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .

दैनंदिन व्यवहारातील तसेच जनजागृती अभियानात याचा उपयोग कसा करता येईल त्याचे महत्व पटवून दिले . सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. अधिष्ठाता संपदा संत मॅडम उपस्थित होत्या तसेच पंचकर्म विभागप्रमुख वैद्या. सिमा बहातकर मॅडम, वैद्य मनोज गायकवाड सर, वैद्य दिलीप वांगे सर, वैद्य गुरुनाथ खानोलकर सर,वैद्या मीनाक्षी रेवडकर मॅडम,वैद्य कैलाश सोनमणकर सर,वैद्य. राजीव टारपे सर, वैद्य. सुरेश दहिफळे सर उपस्थित होते तसेच एकूण 300 विद्यार्थी, अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी आदि सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

दिनांक: २६ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालयमहाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेदविषयीव्यापक जनजागृती अभियान अंतर्गत पंचकर्म विभागाद्वारे स्थूलता व मधुमेह जनजागृती अभियान कार्यक्रम दिनांक२६/०९/२०२३रोज़ी,म.आ.पोदार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागामध्ये वैद्य रमन घुंगराळकर (आयुष संचालक ) यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता वैद्या. संपदा संत यांच्या अध्यक्षतेखाली प्रियांका सोनार( ICDS Supervisor) व वैद्या सीमा बहातकर (विभाग प्रमुख ), वैद्य मनोज गायकवाड(विभाग प्रमुख स्त्रीरोग प्रसुतीतंत्र) यांनी केले. या कार्यक्रमात वैद्या ज्योती मेघडंबर, वैद्य राजीव टारपे ,वैद्या मिनाक्षी रेवडकर व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

 या कार्यक्रमात स्थूलता व मधुमेह या विषयी आहार, विहार, निदान व पंचकर्म चिकित्सा यांचे मार्गदर्शन बाह्य रुग्णालयातील रुग्ण व जनसामान्यांना करण्यात आले.

दिनांक: २ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २७/०९/२०२३ रोजी रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय तर्फे वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी येथे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत पंचकर्म विभागाद्वारे मधुमेह व स्थूलता या विषयी आहार, विहार,निदान व पंचकर्म याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. वरील कार्यक्रमास मा. अधिष्ठाता डॉ. संपदा संत या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तसेच महाविद्यालयातील अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. विभागातील डॉ. सुरेश दहिफळे (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. राहुल मोहारे(पदव्युत्तर विद्यार्थी ) डॉ. रुचिता (पदव्युत्तर विद्यार्थी) यांनी निदान व पंचकर्म चिकित्सा या विषयी मार्गदर्शन केले.
दिनांक: ३० सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक 30/09/2023 रोजी रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय येथे पंचकर्म विभागाद्वारे मधुमेह व स्थूलता या विषयी आहार, विहार,निदान व पंचकर्म याबद्दल घोष वाक्य स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये 35 घोष वाक्य करण्यात आले. या स्पर्धेसाठी मा. अधिष्ठाता वैद्या संपदा संत मॅडम, वैद्या सीमा बहातकर (विभागप्रमुख ) व ज्योती मेघडंबर (Nodal Officer )यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत एकूण 17 विध्यार्थी सहभागी झाले.