ayurved-institute

दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर व्याख्यान

दिनांक २६/०९/२०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्र राज्यात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अंतर्गत दिनांक २६/०९/२०२३ रोजी रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालय येथील सुवर्णमहोत्सवी सभागृहात आशा सेविका, ANM स्टाफ , कम्युनिटी हेल्थ वर्कर यांना दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने झाली.

वरील कार्यक्रम मा. अधिष्ठाता डॉ.संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. सचिन उपलंचीवार, डॉ. सिद्धी नाचणकर यांनी सदरील विषयावर व्याख्यान दिले. या कायक्रमात एकूण 116 आशा सेविका, ANM स्टाफ, कम्युनिटी हेल्थ वर्कर यांनी लाभ घेतला. विभागातील सर्व अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता परिश्रम घेतले.

दिनांक २७/०९/२०२३
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २७/०९/२०२३ रोजी रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय तर्फे वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी येथे सकाळी १०: ०० ते १.०० या वेळात अधिष्ठाता, डॉ. संपदा संत मॅडम यांच्या मार्गदर्शना अंतर्गत रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालयातील स्वस्थवृत्त , शल्यतंत्र , स्त्रीरोग , कायचिकित्सा , पंचकर्म या विभागतर्फे गर्भिणी परिचर्या , दिनचर्या,ऋतुचर्या, लठ्ठपणा आणि मधुमेह टाळण्याचे उपाय,गुदगत विकारांचे प्रतिबंधक उपाय या विषयी सामान्य व्यक्तीना समजेल अशा भाषेचा उपयोग करुन जनजागृती करण्यात आली .

तसेच स्वस्थवृत या विभागातर्फे या जनजागृती अभियान अंतर्गत ,सामान्य नागरिकांकडून आयुर्वेदिक दिनचर्या प्रश्नावली भरून घेण्यात आली आणि त्यांचे वजन ,बी.पी यांची मापे घेऊन त्यांना दिनचर्या/ऋतुचर्या या विषयाची माहिती असलेली पत्रिका देण्यात आली . सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पोलीस कॅम्प येथील गणपतीची आरती अधिष्ठाता, डॉ. संपदा संत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच त्यानंतर त्तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांचे दिनचर्या या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले .त्यानंतर दयानंद शेंडगे यांचे कॅन्सर मध्ये गिलोयचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले.

तसेच स्माइल इंडिया न्यूज़ द्वारे मा. अधिष्ठाता डॉ.संपदा संत यांची मुलाखत घेण्यात आली व आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियानामध्ये केलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती सोशल मिडिया द्वारे प्रसारीत करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणेश नागरे ,आध्यक्ष राजेश लाड ,समाजसेविका कल्पना साठम मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.जनजागृती अभियान कार्यक्रमचा लाभ १०० सामान्य नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमास माननीय,अधिष्ठाता, वैद्या .संपदा संत मॅडम, वैद्या. ज्योती मेघडंबर, नोडल अधिकारी, आयुर्वेद जनजागृती अभियान, डॉ.प्रशांत दळवी,डॉ.रेखा कुवर ,डॉ ऋतुजा गायकवाड, डॉ. आरती दाते, डॉ,सुरेश दहिफळे, डॉ.ऐश्वर्या साठे, डॉ.हर्षा सिंघ डॉ. श्रीकांत यांची उपस्थिति व सहकार्य लाभले यामध्ये स्वस्थवृत विभागातील डॉ सचिन उपलंचिवार,डॉ. शीतल बनसोडे,डॉ सिद्धी नाचणकर,पदव्युत्तर/पदवी विद्यार्थी व तृतीय वर्ष विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला