ayurved-institute

आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कार्यक्रम

रा . आ . पोदार आयुर्वेद महाविद्यालय वरळी, मुंबई - १८,
आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कार्यक्रम - ०७ /११ /२०२३


वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र शासन . यांच्या संकल्पनेतून आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या वर्षी आयुष मंत्रालय तर्फे .७ नोव्हे २०२३ रोजी आठवा आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. या वेळेस G20 प्रेसिडेन्सी ची थीम वसुधैव कुटुंबकं यावर आधारित प्रत्येकासाठी दररोज आयुर्वेद" अर्थात "हर दिन हर के लिये आयुर्वेद या विचार धारे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 सदर संकल्पने अंतर्गत रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय व म. आ पोदार रुग्णालय मुंबई वरळी ,मुंबई १८, दिनांक ०७/११/२०२३ रोजी केंद्र शासन,राज्य शासन आणि आयुष संचालनालय,मुंबई व्दारा सामुहिक आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस रन फॉर आयुर्वेदा रेसकोर्स ,महालक्ष्मी,मुंबई येथे सकाळी ०५.३० ते ७.३० या वेळात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरवात सूक्ष्म व्यायामाणी करण्यात आली ,त्यानंतर या कार्यक्रमामध्ये स्वस्थवृत विभागा द्वारे आयोजित केलेले आयुर्वेद जनजागृती अभीयानाशी निगडित नृत्य सादर करण्यात आले यामध्ये एकूण ६ प्रथम वर्षीय विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग घेतला .

 या कार्यक्रमास प्रमुख अतिथि माननीय, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.हसन मुश्रीफ़जी, माननीय,श्री . दिनेश वाघमारे IAS मानद प्रधान सचिव. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग. महाराष्ट्र शासन माननीय,श्री .राजीव डी निवतकर IAS माननीय वैद्यकीय शिक्षण आणि आयुष आयुक्त. माननीय,प्रा. वैद्य . रमण घुंगराळेकर माननीय संचालक, आयुष संचालनालय. माननीय,डॉ. ए.एस. आर. गोविंद रेड्डी सहाय्यक संचालक (आयु) प्रभारी CCRAS- RRAP CARL. मुंबई आयुष मंत्रालय, माननीय,अधिष्ठाता,वैद्या.संपदा संत यांची उपस्थिति लाभली. यामध्ये महाविद्यालय व रुणालया तील सर्व वर्षांचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी अध्यापक नर्सिंग स्टाफ अध्यापकेतर कर्मचारी या सर्वांनी आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.

Thank you Honorable Commissner Shri. Rajiv Niwatkar, , Hon. Secretory Shri. Dinesh Waghmare , Hon. Director Dr. Raman Ghungralekar ,Hon. Dean Dr. Sampada Sant Podar College,Hon. Director CCRAS Dr. Govind Reddy for your guidance and support for making this event ( Run for Ayurveda) successful.