ayurved-institute

महाराष्ट्र राज्यात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान

Janjagruti
महाराष्ट्र शासन, आयुष संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांचेकडून आलेल्या सूचनेनुसार शासनाने ( वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ) महाराष्ट्र राज्यात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान माहे डिसेंबर २०२३ पर्यंत राबवावयाचे आहे. त्या संदर्भामधे खालील विषयांबाबत जनसामान्यांमध्ये

१. गर्भिणी परिचर्या संबंधी जनजागृती .
२. दिनचर्या व ऋतुचर्या संबंधी जनजागृती .
३. स्थूलपणा व मधुमेह प्रतिबंधा बाबत जनजागृती .
४. गुद् गत विकार प्रतिबंधा बाबत जनजागृती .

वरिल विषयांस अनुसरून आज दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता रा .आ. पोदार आयुर्वेदीक वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई या ठिकाणी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उद्‌घाटन आयुष संचालक , माननीय डॉ. रामण घुंगराळेकर सर, माननीय अधिष्ठाता रा . आ . पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय डॉ. संपदा संत मॅडम , यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास स्त्री रोग प्रसूती विभागाचे विभागप्रमुख डॉ. मनोज गायकवाड , शल्यतंत्र विभागप्रमुख डॉ. विजय उखळकर, पंचकर्म विभागप्रमुख डॉ. सीमा बहातकर उपस्थित होते. कायचिकित्सा विभागप्रमुख डॉ. गीता परुळकर , नोडल ऑफिसर डॉ. ज्योती मेघडंबर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत मुक्कावार , स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ. सचिन उपलेंचवार ,तसेच डॉ. वाघमारे सर, डॉ. प्रशांत दळवी, डॉ. साळुंके , डॉ. मीनाक्षी रेवडकर , डॉ. मगरे ,डॉ. आरती दाते, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. माधुरी भंडारे, डॉ. राजीव टारपे,डॉ. श्रीकांत, डॉ. शुभदा हाके, डॉ. प्राची तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने जनजागृती अभियानाची सुरुवात झाली.